• १० मिनिटं आहेत? - मग पटकन झटका चेहऱ्यावरची मरगळ!  एकेक दिवस असा उजाडतो की कामं संपत नाहीत. उन्हात भटकावं लागतं. कामाचा डोंगर, चिडचिड. जेवणाची वेळ टळून जाते. त्यात डोळे चुरचुरतात. चेहरा निस्तेज दिसू लागतो. आपल्या मनावर आलेली मरगळ चेहऱ्यावरही दिसू लागते. चेहरा कोरडा, अगदीच डल दिसू लागतो. आपण चेहऱ्यावर पाणी मारतो. लोशन्स चोपडतो. पण कसलं काय, चेहरा अत्यंत निस्तेजच दिसतो. बरं एवढं करुन आपल्याला घरीच रहायचं असेल तर ठीक आहे. पण त्याचदिवशी एखादं लग्न असेल, कुणाकडे जेवायला जायचं असेल, घरी पाहुणे येणार असतील तर? मग आणखीच वैताग येतो की आजच आपण असे निस्तेज दिसतोय. काय करणार? मुख्य म्हणजे चेहऱ्यावरचा थकवा कसा घालवणार? त्याचं उत्तरं शोधलं तर ते आपल्या किचनमध्येच आहे. फक्त गरजेप्रमाणे ५ ते ३० मिनिटं आपण स्वत:साठी काढायला हवीत. आणि हे उपाय फक्त बायकांसाठी नाहीत,पुरुषही ते करुच शकतात.

  १) बटाटा बारीक किसून मिक्सरध्ये पेस्ट होईपर्यंत फिरवायचा. ती पेस्ट चेहऱ्याला फक्त ३० मिनिटं लावून ठेवायची. काळपटपणा, कोरडेपणा निघून जातो. चेहऱ्याला तकाकी येते.  • २) अननसाचा गर आणि मध एकत्र करुन चेहऱ्याला लावावं. हा लेप फक्त १० मिनिटं चेहऱ्याला, मानेला लावला तरी चेहरा सतेज होतो.
   ३) पपईचा गर+मुलतानी माती+मध हे समसम प्रमाणात घेवून चेहऱ्याला लावावं. १० मिनिट ठेवावं. मऊ, चमकदार दिसतो चेहरा.
   ४) काकडीचा गर आणि दही एकत्र करुन चेहऱ्याला लावावं. दहा मिनिटं ठेवावं. हा लेप हाताला, कोपरांना, गुडघ्यांना, घोट्याच्या इथं काळवंडलं असेल तर तिथंही लावता येतो. गार वाटतं आणि काळपटपणा कमी होतो.

  credit: http://www.lokmat.com/storypage.php?catid=428&newsid=18893185
  आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
  तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
  Email : komal8pat@gmail.com

  Fashion

  Beauty

  Travel