• लहान मुलांच्या डोळ्यांसाठी खास टिप्स  लहानग्या वयात मुलांच्या डोळ्यांवर चष्मा लागू नये, म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –
  1. मुलांची दृष्टी कमी होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पौष्टीक अन्नाची कमतरता होय.
  2. कमी प्रकाशात, अंधारात वाचण्यामुळे डोळ्यांना त्रास होतो.
  3. टीव्ही आणि मोबाईलसारख्या गॅझेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होतो.
  4. डोळे हेल्दी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए, बी, सी आणि डी ची गरज असते.
  5. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी भोपळा महत्वाचा आहे.
  6. मुलांचे डोळे चांगले ठेवण्यासाठी त्यांना गाजर, बीट आणि रताळी खायला द्यावी.
  7. चांगल्या डोळ्यांसाठी मुलांना अक्रोड भाजून द्या. तसंच अळशीच्या बियाही उपयुक्त ठरतात.
  8. मुलांना त्या-त्या हंगामातील फळं खायला देणं आवश्यक आहे. त्यामुळेही दृष्टी चांगली राहते.
  9. आवळ्याचा मुरंबा मुलांच्या डोळ्यासाठी फायदेशीर ठरतो.
  10. हिवाळ्यात मुलांना सूर्यप्रकाशात खेळू द्या.
  11. सूर्यप्रकाशामुळे मुलांना व्हिटॅमिन डी मिळतो, जे डोळ्यांसाठी उत्तम असतं.
  12. नजर चांगली ठेवण्यासाठी दूध आणि अंडीही महत्त्वाचा पर्याय आहे.
  नोट: कोणत्याही टिप्सची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.


  Credit: http://abpmajha.abplive.in/mumbai/simple-eye-care-tips-for-kids-423665
  आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
  तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
  Email : komal8pat@gmail.com

  Fashion

  Beauty

  Travel