• केसांना आग लागूनदेखील धमाल-मस्तीत गात राहिला होता मायकल जॅक्सन  पॉपच्या जगातील बादशाह दिवंगत मायकल जॅक्सनला या जगाचा निरोप घेऊन 8 वर्षे लोटली आहेत. 25 जून 2009 रोजी मायकल आपल्या घरात मृतावस्थेत आढळला होता. मायकल जॅक्सन हे नाव जगातील प्रत्येकाच्या परिचयाचे आहे. 13 ग्रॅमी अवॉर्ड्स आपल्या नावी करणारा मायकल एकमेव कलाकार आहे. याशिवाय गिनीज अवॉर्ड, 26 अमेरिकन म्युझिक अवॉर्ड, ग्रॅमी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड आणि ग्रॅमी लीजेंड अवॉर्डने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्डसमवेत अनेक अवॉर्ड नावी करणारा मायकल जॅक्सन एकमेव कलाकार होता, ज्याने पॉप संगीताचे जगच बदलून टाकले.

  मायकल जॅक्सनचे संपूर्ण आयुष्यच रहस्यमय होते. मात्र त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्याच्या चाहत्यांना काळजीत टाकले होते. ही गोष्ट 27 जानेवारी 1984ची आहे. जॅक्सन त्यादिवशी लॉस एंजिलिस येथे पेप्सी या प्रसिद्ध कोल्डड्रिंकसाठी जाहिरातीचे शूटिंग करत होतो. या जाहिरातीत स्पेशल इफेक्ट होते. शूटिंग करत असताना जॅक्सनच्या केसांना अचानक आगा लागली. त्यावेळी सेटवर जवळजवळ तीन हजार लोक उपस्थित होते. सर्वांना जॅक्सनच्या डोक्याला आग लागल्याचे दिसले. आग लागूनदेखील जॅक्सन मुळीच डगमगला नाही आणि 'बिली जीन' या गाण्यावर परफॉर्म करत राहिला.

  प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, जणू काही घडलेच नाही, असे जॅक्सन त्यावेळी वागला होता. मात्र आग लागल्याचे बघून लोकांनी ती विझवली आणि स्ट्रेचरवर ब्रॉटमन मेडिकल सेंटरमध्ये त्याला दाखल करण्यात आले. ज्या वॉर्डमध्ये मायकलला दाखल करण्यात आले होते, त्याचे नाव नंतर मायकल जॅक्सन बर्न सेंटर असे ठेवण्यात आले होते.


  Credit: http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-HOL-death-anniversary-michael-jackson-5631547-PHO.html?seq=6
  आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
  तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
  Email : komal8pat@gmail.com

  Fashion

  Beauty

  Travel