• सचिन..अ बिलिअन ड्रीम्स' अनोखा विक्रम

  Sachin: A Billion Dreams

  भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत सचिन..अ बिलिअन ड्रीम्स चित्रपटाने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. 26 मे रोजी प्रदर्शित झालेला हा डॉक्यू ड्रामा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. मास्टर ब्लास्टरच्या जीवनावर आधारीत हा डॉक्यू - ड्रामा सलग तीन आठवडे थिएटरमध्ये सुरू होता. हा चित्रपट मराठी, इंग्लिश, तेलुगु, हिंदी आणि तामिळ भाषेत प्रदर्शित झाला होता होता. तर महाराष्ट्र, केरळ, ओडिसा, दिल्ली, गोवा आणि छत्तीसगड या राज्यांनी करमुक्त केला होता.

  सचिन - ए बिलीयन ड्रीमचे निर्माते रवी भागचंदका माध्यमांशी बोलताना म्हणाले, या क्षेत्रातील अनेकजण गोंधळात होते कारण अशा प्रकारचा डॉक्यू - ड्रामा भारतात कसा चालेल याबद्दल ते साशंक होते. पण सचिनचा जीवनपट मांडण्यासाठी आमचे व्हिजन शुध्द आणि सुस्पष्ट होते. या माध्यामातून त्याची कथा उलगडेल यानर आम्ही ठाम होतो. हा डॉक्यू ड्रामा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला याचा आम्हाला आनंद आहे, असेही ते म्हणाले.


  credit : http://www.lokmat.com/storypage.php?catid=247&newsid=18893856
  आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
  तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
  Email : komal8pat@gmail.com

  Fashion

  Beauty

  Travel