• कन्नड सैराटमध्ये ‘रिंकू’च साकारतेय नायिकेची भूमिका  पुणे – सैराट’ चित्रपटाच्या कन्नड भाषेतील रिमेकचे शूटींग सुरू झाले असून यात रिंकु राजगुरु काम करत आहे. या चित्रपटात रिंकुचा नायक साऊथ इंडियातील प्रसिद्ध खलनायक सत्यप्रकाश यांचा मुलगा सी. बी. राज. असून या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. नारायण करीत आहेत.

  कन्नड चित्रपटासाठी 1200 हून अधिक मुलींचे ऑडिशन घेण्यात आली होती. मात्र आर्चीच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल असा एकही चेहरा यामध्ये निर्माता रॉकलईन व्यंकटेश यांना सापडला नव्हता. अखेरीस दिग्दर्शक एस. नारायण यांनी रिंकु राजगुरुने ही भूमिका करावी अशी इच्छा व्यक्त केली होती. यंदा 10 वी चे वर्ष असल्यामुळे रिंकु याला होकार देईल की नाही, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र ही अटकळ खरी ठरली असून कन्नड ‘सैराट’चे शूटींग सुरू झाले आहे.

  ‘सैराट’च्या कन्नड रिमेकच्या शूटींगच्या वेळचे फोटो सोशल मीडियावर लिक झाले असून आता हे फोटो व्हायरल होत आहेत. ‘सैराट’मध्ये आर्ची आणि परशा आपल्या मुलासह प्लॅट बघायला जातात हा सीन सुरू असतानाचे हे फोटो आहेत.

  (dainikprabhat.com)
  आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
  तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
  Email : komal8pat@gmail.com

  Fashion

  Beauty

  Travel