• मिस्टर परफेक्‍शनिस्ट करणार नागराज मंजुळेसोबत काम


  मुंबई – मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खान हा सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेसोबत आगामी चित्रपटात काम करणार आहे. आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. फॅंड्री आणि सैराट या दोन्ही चित्रपटांमुळे आमिर नागराजवर अतिशय प्रभावित झाला होता.

  सैराट चित्रपट पाहिल्यानंतर आमिरने लगेच ट्‌विट करुन नागराजचे कौतुक केले होते. अजूनही चित्रपटाच्या धक्‍क्‍यातून सावरलो नसल्याचे तो ट्‌विटरवर म्हणाला होता. फॅंड्री चित्रपटाच्या प्रिमियरला आमिर हजर राहिला होता. यावेळी सोमनाथ अवघडे आणि सूरज पवार या फॅंड्रीतील कलाकारांचे कौतुकही त्याने केले होते.

  (dainikprabhat.com)
  आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
  तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
  Email : komal8pat@gmail.com

  Fashion

  Beauty

  Travel